गॅस चोरी प्रकरणी एकास अटक

0
161

रहाटणी, दि. १४ (पीसीबी) – धोकादायकरीत्या भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये चोरून गॅस काढल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) रात्री पावणे दहा वाजता नखाते नगर, रहाटणी येथे साईराम गॅस सर्विस या दुकानात करण्यात आली.

ज्ञानेश्वर नरसिंगराव बाबळसुरे (वय 41, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सौदागर लामतुरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने भरलेल्या सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. चोरून भरलेल्या सिलेंडरची चढ्या भावाने विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करत ज्ञानेश्वर याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.