गॅस चोरी करून चढ्या दराने विक्री

0
45

काळेवाडी, दि. 03 (पीसीबी) : मोठ्या सिलेंडर मधून चोरून गॅस काढून त्याची चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई काळेवाडी पोलिसांनी एक डिसेंबर रोजी आदर्शनगर काळेवाडी येथे केली.

आशिष अशोक नागरे (वय 21, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजय फल्ले यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याचे काळेवाडी येथे सुभद्रा गॅस एंटरप्राइजेस नावाचे दुकान आहे. त्या दुकानामध्ये त्याने मोठ्या गॅस सिलेंडर मधून चोरून लहान सिलेंडर मध्ये गॅस काढला. त्या लहान सिलेंडरची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काळेवाडी पोलिसांनी कारवाई करत आशिष याला अटक केली. त्याच्याकडून 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.