गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राजीनामा द्यावा: मराठा क्रांती मोर्चा

0
216

पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) – जालना येथील आनंतरवाली साराटी येथे मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या शांततेच्या आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांडे व त्यांचे सहकारी मराठा आंदोलक यांच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला, अश्रुदुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या व हवेत गोळीबार करण्यात आला यामध्ये यामधे शेकडो आंदोलक, माता भगिनी, लहान मुले जखमी झाले.याच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चा, विविध सामाजिक संघटना व सकल मराठा समाजाचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या वतीने अनेक मागण्या करण्यात आल्या कायदेशीर मार्गाने चालू असलेले आंदोलन जाणूनबुजून सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न केला गेला या यामध्ये अनेक जणांचं रक्त सांडले गेले या प्रत्येक रक्ताच्या थेंबाची किंमत गृहमंत्र्यांना भोगावी लागेल लाठीचार्जचे आदेश देणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देखील समाजाच्या वतीने अतिशय तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

तसेच या सरकारचे मतपेटीतून विसर्जन केल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही असा इशाराच देण्यात आला तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांसह जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे.आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. सदर घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्या संतप्त आंदोलकांकडून करण्यात आल्या. यावेळी सतिश काळे , जीवन बोराडे, प्रकाश जाधव, राजेंद्र कुंजीर,काशिनाथ नखाते,अभिमन्यू  पवार,नकुल भोईर,सागर तापकीर,धनाजी येळकर,राहूल मदने,गणेश,भांडवलकर, कल्पना गिड्डे, सुनिता शिंदे ,रेखा देशमुख, वाल्मिक माने ,प्रकाश बाबर,उदयसिंग पाटील, जयराम नाणेकर,अभिषेक म्हसे,विजय घोडके,लक्ष्मण देसाई,रवी सोळंके,विकास बोराडे,दिलीप दातीर,सुमंत तांबे, ज्ञानेश्वर लोभे,गणेश कुंजीर,किशोर मोरे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते  उपस्थित होते.