गृहमंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या – सुप्रिया सुळे

0
261

मुंबई, दि. १ (पीसीबी) – गृहमंत्रालय झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात होणाऱ्या दंगली हे गृहमंत्रालयाचं मोठं अपयश असल्याचंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राम नवमीच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी राडे आणि तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्याचबरोबर छ. संभाजीनगरमधील किराडपुरा भागामध्ये दंगल उसळली होती. येथील अनेक भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान मुबईतल्या मालवणी परिसरात राम नवमीच्या शोभायात्रे दरम्यान तीन गटांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं. या सर्व घटनांवरून आता विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
खासदार सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रात दंगली होणं ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे.