गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने 41 लाखांची फसवणूक

0
196

चिखली,दि.18 जुलै (पीसीबी) – गृहकर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने चार जणांनी मिळून एका व्यक्तीची 41 लाख आठ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जून 2023 ते 18 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कृष्णानगर चिंचवड, इंडियन बँक शाखा भोसरी आणि दुय्यम निबंधक कार्यालय नऱ्हे आंबेगाव येथे घडली.

प्रवीण रामदास मानकर (वय 38, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश उर्फ पांडुरंग दादाराव कदम (वय 30, रा. रावेत), श्रीनिवास नामदेव काटंबे (वय 31, रा. काळेवाडी), लक्ष्मण पवार (रा. काळेवाडी), रुपाली तरस नाव धरण केलेली अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी मानकर यांना गृहकर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मानकर यांच्या सदनिकेवर तीन बँकांचे गृहकर्ज मंजूर केले. आरोपींनी बिल्डर रुपाली तरस नावाची दुसरीच महिला उभी करून तिचे बनावट कागदपत्र बनवून बँक खाते बनवले. इंडियन बँक शाखा भोसरी या बँकेचा 41 लाख 8 हजार रुपयांचा डी डी त्या खात्यात जमा करून ते पैसे परस्पर काढून घेत मानकर यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.