गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड मध्ये जल्लोष

0
257

गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हींग पिंपरी चिंचवड परिवारातर्फे १३ मे रोजी रुद्रपूजा, सत्संग व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड मधील 1200 पेक्षा जास्त साधकांनी उपस्थित राहून आनंद उत्सव साजरा केला. हा उत्सव कासा दी सिल्व्हर बँक्वेट सभागृह, ताथवडे येथे आर्ट ऑफ लिव्हिंग चे स्वामी शरणानंद जी ह्यांच्या सानिध्यात रुद्रपूजा, सत्संग व महाप्रसाद ने झाला.

लहान मुले, तरुण, जेष्ठ सर्व भाविकांनी रुद्रम मंत्राने गहन ध्यान आणि सत्संग मध्ये नृत्य करून भरपूर आनंदाचा अनुभव घेतला.संपूर्ण उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

तसेच पिंपरी चिंचवड मध्ये १३ मे रोजी रक्तदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले त्यामध्ये ८७ साधकांनी रक्तदान केले.