गुप्तदान करण्याचा बहाणा करत महिला व्यावसायिकाचे दागिने केले लंपास

0
232
shiny gold and silver jewelery on white table

निगडी, दि. १७ (पीसीबी)- गुप्तदान करण्याचा बहाणा करून व्यावसायिकाचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. हा साराप्रकार मंगळवारी (दि.16) निगडी गावठाण येथील वैष्णवी जनरल स्टोअर येथे घडली आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुकानात असताना साधारण 45 ते 50 वर्षाचा वयाचा व्यक्ती त्यांच्या दुकानात आला. त्याने साईबाबांना मंदिरात गुप्तदान करायचे आहे. अशी बुरळ पाडून फिर्यादी यांच्याकडील 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व दोन अंगठ्या असा एकूण 81 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस याप्रकरणचा पुढील तपास करत आहेत.