गुन्हे शाखेचा दारू भट्टीवर छापा

0
24

चाकण, दि. 19 (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट तीनने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ गावात एका दारू भट्टीवर छापा मारला. यामध्ये सव्वा लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 18) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

रोहित जंगती रजपूत (रा. बहुळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप सोनवणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुळ गावामध्ये पठारवस्ती जवळ दारूभट्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये 3800 लिटर कच्चे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख 33 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.