गुन्हेगार निलेश गायवळ वाढदिवसाच्या फ्लेक्स बद्दल गुन्हा दाखल

0
234

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार निलेश गायवळ व इतर दोघांचे अनधिकृत फ्लेक्स लावल्या प्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत चांदणी चौकात पाईपलाईन हायवे रोड लगत निलेश गायवळ याचे तसेच इतर दोघांचे वाढदिवसानिमीत्त अनधिकृत फ्लेक्स लावल्याने हिंजवडी पोलीस स्टेशन व पुणे महानगरपालीका बावधन क्षेत्रीय कार्यालय यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून सदरचे अनधिकृत फ्लेक्स काढून टाकले आहेत.

निलेशभाऊ गायवळ बुथ फाउंडेशनचे सदस्य व इतर दोघांवर अनधिकृत फ्लेक्स लावल्या प्रकरणी निलेश काळुराम घोलप परवाना निरीक्षक कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालय यांनी फिर्याद दिली. हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहीता कलम १८८ व महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरणास प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.