गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत पाच लाखांची फसवणूक

0
70

दि. ३१ जुलै (पीसीबी) हिंजवडी,
अमली पदार्थांची तस्करी केल्याचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत एका तरुणीची चार लाख 90 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 20 ते 21 जुलै दरम्यान मुकाई नगर, हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी मुकाईनगर, हिंजवडी येथे राहण-या 27 वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. 30) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9299032228 या मोबाइल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9299032228 या अनोळखी क्रमांकावरून फिर्यादी तरुणीला फोन आला. मी मुंबई फेडेक्स कुरीअर सर्व्हिसमधून बोलतो आहे. तुमच्यावरती अमली पदार्थ तस्करीची केस आहे. मी तुमचा कॉल पोलीस अधिकारी यांच्याकडे ट्रान्सफर करतो आहे. ते गुन्हा रजिस्टर करतील, असे सांगून फिर्यादी यांच्या मोबाइलवरील स्कॉयपर कॉल करुन मिलिंद कामत नावाचे पोलीस आयडी कार्ड पाठवून फिर्यादी यांना घाबरावून तसेच त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्या बँक खात्यातील एकूण 4 लाख 90 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.