गुड न्यूज- विनेश फोगट ला रौप्य पदक मिळणार

0
191

पॅरिस, दि.8 ऑगस्ट (पीसीबी) – भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची कु्स्तीपटू विनेश फोगटला जास्त वजनामुळे काल बुधवारी अपात्र ठरवण्यात आले होते आणि त्यामुळे तिचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न हुकले होते तर हक्काचे रौप्यपदक देखील गेले होते. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर भारताने आव्हान दिले होते. आता याबाबतचा निर्णय झाला असून विनेशला रौप्य पदक मिळणार असल्याचे निर्णय देण्यात आला आहे. या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने CASकडे दाद मागितली होती. विनेशने केलेल्या अर्जावर स्वीकारण्यात आला असून आता त्यावर सुनावणी होणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने मंगळवारी सलग ३ लढती जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र ७ तारखेला सकाळी झालेल्या तपासणीत तिचे वजन १०० ग्राम अधिक असल्याचे आढळले. यामुळे विनेशवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईवर भारताने नाराजी व्यक्त करत आक्षेप घेतला होता. देशातील सामान्य नागरिकांसह संसदेत देखील याचे पडसाद उमटले होते.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस; नीरज चोप्राचे गोल्ड, हॉकीच्या या निर्णयाविरुद्ध भारतीय कुस्ती महासंघाने संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेकडे याचिका केल्याचे भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांनी सांगितले होते. अपात्रेच्या निर्णयावर विनेशने सीएएसकडे दोन याचिका केल्या होत्या. पहिली याचिका तिच्या वजनाबाबत होती. ज्यात तिने वजन पुन्हा करण्याची मागणी केली होती. ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. ही याचिका फेटाळून लावताना कोर्टाने निर्णय झाल्याचे म्हटले होते.

विनेशची दुसरी याचिका तिला रौप्यपदक देण्याबाबत होती. कारण एक दिवस आधी तिने निश्चित केल्या वजनासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या याचिकेवर जर सीएएसने विनेशच्या बाजूने निर्णय दिला तर तिला रौप्य पदक मिळले. विनेशच्या या याचिकेवरील सुनावणी उद्या ९ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे.