गुडीपाडव्या निमित्त कासारवाडीकरांना MNGL गॅसची भेट – सौ. आशा धायगुडे यांच्या पाठपुराव्याला यश

0
313

कासारवाडी, दि. २४ (पीसीबी) – गुडीपाडव्याच्या निमित्ताने कासारवाडीकरांना MNGL गॅसची भेट मिळाली आहे. जेष्ठ माजी नगरसेविका सौ. आशा धायगुडे यांनी या विषयाचा वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर कासारवाडीकरांना MNGL गॅसची सुविधा मिळाली आहे. छोटेखानी कार्यक्रमात या उपक्रमाचे नागरिकांनीही उत्फुर्त स्वागत केले.यावेळी बोलतना आशा शेंडगे म्हणाल्या, MNGL गॅॅसची नागरिकांना आवश्यकता आहे याची जाणीव मला झाली. मनातले कृतीत आणण्यासाठी MNGL च्या पुणे जिल्ह्याच्या विभागीय कार्यालयास भेट दिली. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की गेटाच्या पलीकडील कासारवाडी ही MNGL गॅसचा पुुरवठा करण्यासाठी एखाद्या बेटा सारखी आहे.

कारण एका बाजूस नदी असल्याने पाटपंधारे खात्याची मंजूरी आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूस रेल्वे व पुणे- मुंबई महामार्ग असल्याने केंद्र शासनाची मंजूरी पाहिजे होती. त्यामुळे हे काम तसे खूप अवघड होते. परंतु MNGL चे विभागीय अधिकारी श्री. रितेश इंगळे, महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि 7 एप्रिल 2022 रोजी MNGL गॅस पाईप लाईनच्या कामाची सुरुवात झाली. पाडव्याच्या शुभमुर्तावर रिव्हु इस्टेट या सोसायटी मधील श्री. दिपक बुटे यांच्या घरातील पहिला MNGL गॅस सुरू केला गेला.

खरे तर, या कामासाठी MNGL च्या कार्यालयातील मंजूरी साठी मारलेले हेलपाटे, गॅसची लाईन टाकण्यासाठी करावा लागणारा सर्वे, नागरिकांचे फॉर्म भरणे अशा अनेक आव्हानांना सामोरे जात गुढीपाडवाचा आनंदाचा दिवस उजाडला. अवघ्या 11 महिने 15 दिवसात कासारवाडीकारांना MNGL गॅस सुविधा देण्याचा भाग्य मला लाभले. सर्व कासारवाडीकरांचे स्वप्न सत्यात उतरविण्यात मला यश मिळाले याचे मला खूप मोठे समाधान आहे, अवघड, अशक्य कामात मिळालेले यश कित्तेक पटीने साकात्मक ऊर्जा देवून जाते., असे सौ. आशा शेंडगे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या शुभ प्रसंगी माननीय श्री. संजय शेंडगे सर अध्यक्ष श्री. अनिल शेळके साहेब, सचिव श्री. आनंद पवार साहेब, श्री. संतोष ज्ञानदेव गिड्डे सर, श्री.सावता गोविंद गिड्डे, श्री. प्रवीण नाफडे, श्री. तलवार साहेब, श्री.पाटील साहेब, श्री भोसले साहेब, श्री.आवळे साहेब, सौ शोभा सावता गिड्डे, सौ.स्वप्ना राणी संतोष गिड्डे, सौ दळवी वहिनी, श्री. संजय दळवी साहेब, श्री. सुनील दळवी साहेब, श्री. दीपक बुट्टे साहेब, श्री. व सौ. तांदळे, सौ.भोर, श्री व सौ निकम, श्री मगर काका व सौ मगर काकू, श्री अशोक पवार साहेब इत्यादी उपस्थित होते.