गुडगावातून दोन तरुण दारू सोडायला चंद्रपुरात आले आणि …

0
144

चंद्रपूर: दारूच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठी काही तरुणांनी दारु सोडण्याचं औषध घेतले. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याची धक्कादायक घटना जिल्हातील भद्रावती तालुक्यात घडली आहे. सहयोग सदाशिव जीवतोडे (१९), प्रतीक घनश्याम दडमल (२६) अशी मृत तरुणांची नावे आहेत. सदाशिव पुंजाराम जीवतोडे (४५), सोमेश्वर उद्धव वाकडे या दोघांवर उपचार सुरु आहे. औषध देणारा वैद्य एकनाथ शेळके महाराज याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

प्राप्त माहिती नुसार, गुडगाव येथील हे चार तरुण दारुमुळे व्यसनाधीन झाले होते. वर्धा जिल्हातील शेडगाव येथे दारू सोडण्यासाठी औषध देणारा महाराज असल्याची माहिती या तरुणांना मिळाली. औषध घेण्यासाठी हे चौघे जण एकनाथ शेळके महाराजाकडे गेले. शेळके महाराज यांनी औषध दिली. दिलेली औषध चौघांनी तिथेच खाली. सायंकाळ चौघे घरी परतले. त्यांनतर या चौघांची प्रकृती बिघडली. भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र सहयोग सदाशिव जीवतोडे, प्रतीक घनश्याम दडमल या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. उपचार घेत असलेले सदाशिव पुंजाराम जीवतोडे, सोमेश्वर उद्धव वाकडे या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

दारू सोडण्याचे औषध देणारे वैद्य एकनाथ शेळके महाराज यांना समुद्रपुर पोलीस स्टेशन अंतर्गत चौकशी करीता ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. शेडेगाव येथील वैद्य शेळके महाराज यांच्याकडे दारू सोडविण्यासाठी अनेक व्यसनी इसम जात असतात. या अगोदरही दारू सोडविण्याची औषध घेवून आल्यानंतर अनेक व्यसनी इसमांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे शेळके महाराज व त्याच्या दारू सोडविण्याची औषध या दिशेने कसून तपास होण्याची व कारवाई करण्याची गरज असल्याचे परिसरात बोलले जात आहे.घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे. तपासाअंतीचा अहवाल समुद्रपुर पोलीस स्टेशन कडे पाठविण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.