गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडीत कारवाई

0
179

हिंजवडी, दि. ४ (पीसीबी) – गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 45 हजारांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 2) दुपारी अडीच वाजता फिनोलेक्स कंपनीजवळ हिंजवडी येथे केली.

नरेश मुलाराम चौधरी (वय 35, रा. मारुंजी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आरोपीने विक्रीसाठी जवळ बाळगला. आरोपी गुटखा विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी कारवाई करून त्याला पकडले. त्याच्याकडून 45 हजार 113 रुपयांचा गुटखा आणि 35 हजारांची दुचाकी असा एकूण 80 हजार 113 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.