गुटखा विक्री प्रकरणी वाकडं मधून एकास अटक

0
175

दि २६ एप्रिल (पीसीबी ) – गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात एक कारवाई केली. गुटखा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. २५) सकाळी केमसे चाळ, भूमकर वस्ती, वाकड येथे करण्यात आली.

वर्धाराम पोमाजी चौधरी (वय ३७, रा. भूमकर वस्ती, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजित कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर वस्ती येथे एकजण गुटखा विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत वर्धाराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि मोबाईल फोन असा एकूण १७ हजार ७२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.