चाकण, दि.22 (पीसीबी)
गुटखा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २१) सकाळी चाकण येथे करण्यात आली.
गजेंद्र राजेश कुशवाह (वय २३, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथील एका टपरीवर प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गजेंद्र कुशवाह याला ताब्यात घेतले. टपरी मधून पोलिसांनी १५ हजार २८७ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.