पिंपरी, दि. २० (पीसीबी)
गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ४४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास नेहरूनगर येथे करण्यात आली.
अमोल लक्ष्मण कुसाळकर (वय २४, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तेजस भालचिम यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील दोस्ती बेकरी रोडवर एक तरुण गुटखा विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अमोल कुसाळकर याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याच्याकडून ४४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करीत आहेत.