गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

0
120

दि. १६ जुलै (पीसीबी) हिंजवडी,
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करणार्या एका व्यक्तीला हिंजवडी पोलिसांनी मारुंजी रोडवरून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 49 हजार 360 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 15) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

हरिराम जोगाराम देवासी (वय 47, रा. माण फेज तीन, ता. मुळशी. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमर राणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी रोडवर एकजण गुटखा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन हरिराम देवासी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 49 हजार 360 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.