गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक

0
428

पुणे, दि. ११ (पीसीबी) – हॉटेल समोरील टपरीमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या एकाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 81 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास डोंगरवस्ती ते महाळुंगे रस्त्यावर पंचरत्न हॉटेलच्या समोर करण्यात आली.

ईश्वर शेषराव घोरपडे (वय 20, रा. कुरुळी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह धनंजय राणे (रा. कुरुळी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मंगेश कदम यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर याची डोंगरवस्ती ते महाळुंगे रस्त्यावर पंचरत्न हॉटेलच्या समोर टपरी आहे. त्यामध्ये त्याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 81 हजार 810 रुपयांचा गुटखा जप्त केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.