गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

0
189

हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) – विक्रीसाठी गुटखा साठवून ठेवल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एका टपरी चालकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 24) सायंकाळी सव्वाचार वाजता हिंजवडी फेज एक येथील राजपूत पान शॉप येथे करण्यात आली.

बिपीन चौहरजा सिंह (वय 28, रा. हिंजवडी फेज एक) असे अटक केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. त्याच्यासह अनुसिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बिपीन याने त्याच्या टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी टपरीवर छापा मारून कारवाई करत 34 हजार 892 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. हा गुटखा बिपीन याने अनुसिंग याच्याकडून आणला असल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.सिबिल स्कोर चेक करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसव