गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक..

0
200

निगडी, दि. ३० (पीसीबी) – प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 29) दुपारी आकुर्डी येथील ओम साई स्टोअर्स नावाच्या पान टपरीवर करण्यात आली.रामकुमार दशरथ जैस्वाल (वय 42, रा. बिजलीनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह नोपासिंग राजपूत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या पान टपरीमध्ये पाच हजार 581 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेट विक्रीकरिता ठेवले. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी शुक्रवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास आरोपीच्या टपरीवर कारवाई केली. आरोपी नोपासिंग याने तो गुटखा आरोपी रामकुमार याला पुरवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.