काळेवाडी, दि.1 (पीसीबी)
टपरी मध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा ठेवला. याप्रकरणी काळेवाडी पोलिसांनी टपरी चालकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) रात्री कुणाल हॉटेल समोर कुणाल पान शॉप येथे केली.
विनोद स्वामीनाथ प्रजापती (वय ३२, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार स्वप्नील लोखंडे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद प्रजापती कुणाल हॉटेल समोर एक टपरी चालवतो. त्याने टपरी मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काळेवाडी पोलिसांनी कारवाई करत विनोद याला अटक केली. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.