गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

0
6

चिखली, दि.25 (पीसीबी)
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा टपरीमध्ये विक्री करणाऱ्या एकास खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने अटक केली. त्याच्याकडून 31 हजार 435 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) दुपारी बारा वाजताच्या सुमारास चिखली येथे करण्यात आली.

अख्तर अब्दुल खालिद (वय 40, रा. चिखली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार चंद्रकांत जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अख्तर खालिद याची कुदळवाडी येथे पान टपरी आहे. त्याने टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 31 हजार 435 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.