गुटखा विक्रीसाठी जाणाऱ्या तरुणास अटक; 57 हजारांचा गुटखा जप्त

0
60

चिखली, दि. 1३ (पीसीबी) :  गुटखा विक्रीसाठी निघालेल्या तरुणाला निगडी वाहतूक पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 57 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सकाळी जाधव सरकार चौक, चिखली येथे करण्यात आली. मनसीराम गंगाराम देवासी (वय 22, रा. चिखली. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार रोहिदास सांगडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस अंमलदार सांगडे हे निगडी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते गुरुवारी जाधव सरकार चौक चिखली येथे वाहतूक नियमन करत असताना त्यांना एक दुचाकी संशयीतपणे जाताना दिसली. त्यांनी दुचाकी अडवून तपासणी केली असता दुचाकीवरील पिशव्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आढळून आले. पोलिसांनी दुचाकी चालक मनसीराम देवासी याला अटक करत त्याच्याकडून 57 हजार 297 रुपये किमतीचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली. तो गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी घेऊन जात होता. चिखली पोलीस तपास करीत आहेत.