नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २००२ साली गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरातमधील अहमदाबाद येथे हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्या होत्या. त्याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांवर आरोप झाले होते.
या दंगलीत तत्कालीन खासदार एहसान जाफरी यांच्यासह इतर ६९ जणांच्या हत्या झाल्या होत्या. याप्रकरणी एसटीआयने नरेंद्र मोदींसह ६४ जणांना क्लिन चीट दिली होती. एसटीआयच्या या अहवालाविरोधात एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सर्वाेच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट दिली आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली गतवर्षी ९ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती. हा निकाल राखून ठेवत, आज एसटीआयच्या अहवालावर शिक्कामोर्तब करत झाकीया जाफरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत योग्यता नसल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकीया जाफरी यांचा हा खटला ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी लढवला होता. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती दिनेश माहेश्वरी आणि सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीनंतर पंतप्रधान मोदींना गुजरात दंगल प्रकरणी क्लिनचीट मिळाली आहे.













































