मुंबई, दि. ३ (पीसीबी) – गुजरात राज्यात गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर झाली होती. भाजपला तब्बल ९९ जागा तर कॉंग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, नुकत्याच झालेल्या एका निवडणूक सर्वेक्षणात कॉँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
गुजरात विधानसभेची निवडणूका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप, कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षासह सर्व पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देखील गुजरातचा दौरा केला आहे. तर गुजरातमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षानेही या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सी वोटर आणि एबीपी न्यूज यांनी निवडणूक सर्वेक्षण घेतले असून जाहीर करण्यात आलेल्या ओपिनियन पोलमध्ये भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सी-वोटरच्या सर्वेक्षणात भाजपला सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर कॉँग्रेसला गेल्या निवडणुकीपेक्षा मोठा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणूक सर्वेक्षणात गुजरात मधील १८२ विधानसभेच्या जागांमध्ये भाजपला १३५ ते १४३ जागा मिळून मोठे बहुमत मिळण्याची शक्यता आहे.
ओपिनियन पोलमध्ये कॉँग्रेसला केवळ ३६ ते ४४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलअ आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने भाजपला काटे की टक्कर देत तब्बल ७७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, अनेक आमदारांनी कॉंग्रेसमधून भेर पडत पक्षाला राम राम केला होता.
पंजाब विधानसभेत मोठे यश मिळवणारा आम आदमी पक्ष गुजरातमध्ये चांगले यश मिळवण्याची शक्यता आहे. पक्ष या निवडणुकांबात सकारात्मक आहे. गुजरातमध्ये आम्ही सरकार बनवू असा विश्वास आमआदमी पार्टी व्यक्त करत आहे. मात्र, सी-वोटर यांनी केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात पक्षाला शून्य ते दोन जागा मिळेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहेत. तर अन्य पक्षांना केवळ ३ जागा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गुजरातच्या विविध भागात सौराष्ट्रमध्ये भापला जवळपास ३८ ते ४२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसला ११ ते १५ जागा मिळण्याची शक्यता आहे. आपला केवळ ० ते १ जागा मिळू शकते असे सर्वेक्षणात म्हटले आहे. तर अन्य पक्षांना २ जागा मिळू शकतात. दक्षिण गुजरातमध्ये भाजपला २७ ते ३१ जागा, तर कॉंग्रेसला ३ ते ०७ जागा मिळू शकतात, तर आपला २ किंवा शून्य जागा मिळू शकतात. मध्य गुजरातमध्ये भाजपला ४६ ते ५० जागा तर कॉंग्रेसला १० ते १४ जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर आपला १ जागा मिळू शकते. अन्य पक्षांना १ किंवा २ जागा मिळू शकतात.