गुजराथचे अपात्र काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी बेपत्ता

0
136

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खाते उघडलं आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी झाले.सुरतमध्ये भाजपच्या विजयाच्या दुसऱ्याच दिवशी अपात्र काँग्रेस नेते नीलेश कुंभानी बेपत्ता असल्याचे स्थानिकांनी माध्यमांनी आज सांगितले.

नीलेश कुंभानी यांच्याशी फोनवर संपर्क होऊ शकला नाही. एका दिवसापूर्वीच सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यातून मुकेश दलाल यांना विजयी घोषित करण्यात आल्याने ही बाब समोर आली आहे. आता नीलेश कुंभानी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या कुलूप लावलेल्या बंद घराबाहेर पोस्टर्स आणि बॅनरसह निषेध व्यक्त केला होते.

लोकसभेत भाजपच्या पहिल्या बिनविरोध विजयानंतर सुरतमध्ये नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील यांनी सोमवारी सांगितले की, सुरतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहिले कमळ सुपूर्द केले आहे. सूरत लोकसभा मतदारसंघातून आमचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

गुजरातमधील सत्ताधारी भाजपवर आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आणि निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी सोमवारी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले की, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला सूरतमधील निवडणुका पुढे ढकलण्याची आणि पुन्हा निवडणुका घेण्याची विनंती केली आहे.

सिंघवी यांनी दावा केला की, सुरत काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांना चार प्रस्तावकांनी उमेदवारी दिली होती, पण, अचानक चौघेही उभे राहिले आणि त्यांनी स्वाक्षरी देण्यास नकार दिला. हा योगायोग नाही. उमेदवार अनेक तासांपासून बेपत्ता आहेत आणि जेव्हा तो पुन्हा समोर आला तेव्हा आम्हाला कळले की, उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

7 मे रोजी गुजरातच्या सर्व 26 जागांसाठी मतदान होणार आहे, परंतु सुरतच्या जागेचा निकाल आधीच जाहीर झाल्यामुळे आता त्या दिवशी 25 जागांवर मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व २६ जागा जिंकल्या होत्या.