गुजरातमध्ये मोदींच भाषण सुरु होताच लोकांनी काढला पळ…

0
380

देश,दि.०२(पीसीबी) – अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला. सभा सोडून जाणाऱ्या प्रेक्षकांचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. त्याठिकाणी त्यांनी एक सभा देखील घेतली होती. पण भाषणाला सुरवात होताच प्रेक्षक निघून जात असल्याची घटना घडली. या घटनेबाबतचे व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत होते. मोदींच्या सभेत मोकळ्या खुर्च्या दाखवण्यात आल्या आहेत. आणि असाच काहीसा प्रकार आता गुजरातमध्ये पाहायला मिळाला आहे. अहमदाबादमध्ये पंतप्रधान भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला आहे. सभा सोडून जाणाऱ्या या प्रेक्षकांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सदरचा व्हिडीओ क्रॉंग्रेसचे सोशल मीडिया एक्सपर्ट नत्ताशा शर्मा आणि नितिन अग्रवाल यांनी ट्विट केलेला आहे. सोबतच देशात आता परिवर्तन सुरू झाल्याचा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला आहे. या व्हिडीओवर देशभरातील नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही मोदी समर्थक या व्हिडीओला फेक म्हणत आहेत. तर काही विरोधक मोदींच्या खोट्या दाव्यांना वैतागून आता लोकांनी काढता पाय घेतला आहे असे म्हंटले जात आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी ते अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी अशा विविध ठिकाणांना भेट देणार आहेत. या ठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचं भुमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर मोदींचा हा गुजरात दौरा महत्वाचा आहे असं म्हटलं जातेय.