-महापालिका, जिल्हा परिषदेला काँग्रेसच्या 215 उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजप बिनविरोध
दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाऱ्या भाजपाने गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थेतही आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. येत्या रविवारी (१६ फेब्रुवारी) गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन हजार १७८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याआधी काँग्रेसच्या तब्बल २१५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, ज्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा कमी झाली असून या सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. २०२७ मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे.