अहमदाबाद, दि. १४ (पीसीबी) – भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्ताची बोट जप्त केली आहे. या कारवाईमध्ये 200 कोटी रुपयांचे 40 किलो ड्रग्ज जप्त केल्याचेही सांगितले जात आहे. पुढील तपास व कारवाईसाठी बोट व बोटीचे पाकिस्तानी चालक यांना जाखू येथे आणण्यात आले आहे. मागील काही महिन्यापासून गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. गेले सहा महिन्यांत हजारो किलोंनी शेकडो कोटींचा ड्रग्ज चा साठा जप्त होत असल्याने गुजराथ आता देशातील अंमलीपदार्थाचे हब झाल्याची टीका सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये 40 किलो ड्रग्ज दुबई येथून भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
कोलकाता येथे करण्यात आलेल्या कारवाईत गुजरात पोलीस तटरक्षक बल, एनसीबी, पंजाब, दिल्ली पोलीस आणि अन्य एजन्सीने संयुक्त मोहीम राबवत ही कारवाई केली होती. या कारावाईमध्ये 12 गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आलेले 200 कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले होते.