गुजरातमध्ये “करोडपतींची” संख्या वाढली…! १ कोटीहून अधिक उत्पन्न जाहीर करणाऱ्यांमध्ये तब्बल ४९% वाढ

0
269

अहमदाबाद,दि.२९(पीसीबी) – सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये मूल्यांकन वर्ष २०२२-२३ मध्ये १ कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न घोषित करणाऱ्या ‘करोडपती’ करदात्यांच्या संख्येत ४९% वाढ झाली आहे. २०२१ मध्ये १ कोटी किंवा त्याहून अधिक करपात्र उत्पन्न असलेल्या ९३०० लोकांच्या तुलनेत, २०२२ मध्ये ही संख्या ४५०० ने वाढून विक्रमी १४००० झाली असे अधिकृत आकडेवारी दर्शवते.

कोट्यधीशांची संख्या गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाधिक होती, या कालावधीत ही संख्या ७००० वरून १४००० पर्यंत दुप्पट झाली, असे आकडेवारीत म्हटले आहे. ही वाढ लक्षणीय आहे, कारण मागील चार वर्षांमध्ये १ कोटी रुपयांपेक्षा अधिक करदात्यांची सरासरी संख्या ८२०० होती. कॉर्पोरेट श्रेणीमध्ये १००० अधिक करोडपतींची भर पडली कारण ही संख्या ३७०० वरून ४७०० पर्यंत वाढली, जी तब्बल २८% वाढ दर्शवते. नॉन-कॉर्पोरेट श्रेणींमध्ये गुजरातमधील एकूण कर बेस २०२२ मधील ७१.२ लाख करदात्यांच्या तुलनेत २०२२-२३ मध्ये ४% वाढून ७३.८ लाख झाला आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१८ मध्ये एकूण कर बेस ६२.५ लाख होता.

९४% करदात्यांनी १० लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न घोषित केले
मिळालेल्या डेटा नुसार ९४% करदात्यांनी रु. १० लाखांपर्यंतचे करपात्र उत्पन्न घोषित केले आहे. या श्रेणीमध्ये करदात्यांची संख्या २% वाढली आहे, तर १० लाख आणि त्याहून अधिक करपात्र उत्पन्न श्रेणींमध्ये, ३.३५ लाखांवरून ४.३३ लाखांपर्यंत म्हणजे २९% वाढ झाली आहे.

अधिक करपात्र उत्पन्न असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होण्यामागे अनेक कारणे कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. GCCI च्या प्रत्यक्ष कर समितीचे अध्यक्ष जैनिक वकील म्हणाले, “गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट कर कमी करण्यात आला आहे आणि GST ने देखील परिवर्तन घडवून आणले आहे आणि उच्च कॉर्पोरेट रिटर्न्सचे हे मुख्य कारण आहे. वार्षिक माहिती विधान (AIS), जे शेअर बाजारातील उत्पन्न देखील दर्शवते, उच्च उत्पन्न हे देखील अधिक रिटर्न भरण्याचे देखील एक कारण आहे.”

आंतरराष्ट्रीय कर तज्ज्ञ मुकेश पटेल यांनी सांगितले की, “आयकर भरणा आणि फेसलेस असेसमेंट स्कीम (FAS) मध्ये IT चा हस्तक्षेप उच्च दर्जाची अचूकता आणि पारदर्शकता दर्शवते. करदात्यांच्या या संख्येतील वाढ मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, गुंतवणूकदार आणि अगदी तरुण व्यावसायिकांनी केली आहे जे त्यांचे वाढते उत्पन्न जाहीर करत आहेत.”