गुजरातच्या वलसाडमध्ये बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला; ४ मजूर जखमी

0
4

दि.१३(पीसीबी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. औरंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पूल शुक्रवारी अचानक कोसळला, या दुर्घटनेत किमान चार मजूर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.घटनेच्या वेळी पुलाच्या बांधकामस्थळी सुमारे 105 मजूर काम करत होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमी मजुरांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबाबत माहिती देताना वलसाडचे उपविभागीय अधिकारी (SDM) विमल पटेल यांनी सांगितले की,“औरंगा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामादरम्यान एक गर्डर खराब झाल्याने पूल कोसळला. घटनास्थळी 105 मजूर उपस्थित होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.”दरम्यान, या दुर्घटनेबाबत अधिक तपशील अद्याप प्रतीक्षेत असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. बांधकामाच्या सुरक्षिततेबाबतही चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.