गुंतवणूक करण्यास भाग पाडून 46 लाखांची फसवणूक

0
208

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – कन्स्ट्रक्शनच्या कामात पैसे गुंतविल्यास गुंतवलेली रक्कम आणि नफ्यातील 20 टक्के रक्कम देण्याचे आमिष दाखवून एकाची 46 लाख 65 हजार 461 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार नोव्हेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत मारुंजी येथे घडला.

शिवाजी मुरलीधर वाळके (वय 35, रा. वडगाव मावळ. मूळ रा. लातूर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धेश्वर दत्तात्रय वाळके (वय 39, रा. नऱ्हेगाव, ता. हवेली. मूळ रा. लातूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या पत्नीच्या नावाने असलेल्या माही इंजिनिअर्स अँड काँट्रॅक्टर्स या कंपनीला कोलते पाटील डेव्हलपर्स या कंपनीचे कन्स्ट्रक्शनचे काम मिळाले असलेल्या फिर्यादींना सांगितले. फिर्यादींनी त्या कामासाठी पैसे गुंतविल्यास गुंतवणूक केलेली रक्कम आणि होणाऱ्या नफ्यातील 20 टक्के रक्कम देण्याचे फिर्यादीस आमिष दाखवले. त्यासाठी फिर्यादींकडून 50 लाख 70 हजार 114 रुपये गुंतवणूक स्वरूपात घेतले. त्यातील 16 लाख पाच हजार 114 रुपये आरोपीने परत दिले. उर्वरित 34 लाख 64 हजार 708 रुपये आरोपीने दिले नाहीत. आरोपीने घेतलेल्या कामातील 60 टक्के काम पूर्ण झालेले असताना त्यातील 20 टक्के नफ्याची रक्कम 12 लाख 753 रुपये असे एकूण 46 लाख 65 हजार 461 रुपये फिर्यादीस न देता त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.