भोसरी,दि १२ (पीसीबी)- गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक केली. तसेच फसवणूक झालेल्या व्यक्तीची कार नेऊन ती परत दिली नाही. ही घटना जानेवारी 2023 ते 11 जुलै 2023 या कालावधीत भोसरी येथे घडली.
शैलेश बबन ठाकूर (वय 33, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल सतीश मेहर (रा. आळंदी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 18 लाख 98 हजार रुपये घेतले. त्या बदल्यात फिर्यादींना केवळ 11 लाख 87 हजार 500 रुपये फिर्यादीस परत दिले. उर्वरित सात लाख 10 हजार 500 रुपये फिर्यादी यांना परत दिले नाहीत. त्यांनतर नवीन सोन्याची साखळी कमी किमतीत बनवून देतो असे सांगून फिर्यादीकडून 34.5 ग्राम वजनाची एक लाख 81 हजार रुपयांची सोन्याची साखळी घेतली. फिर्यादी यांची कार (एमएच 14/सीएक्स 8041) आरोपीने नेली. ती त्यांना परत दिली नसल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.