भोसरी, दि. २१ (पीसीबी) – कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पडून साडेसात लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी परिसरात घडला.
शंकर फगूनी मुखिया (वय ३७, रा. रा. भोसरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू कुमार रमणजी झा (वय २३, रा. बिहार) आणि अन्य दोन मोबाईल फोन वापरकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ते स्टार पुंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्यांच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल असे त्यांनी फिर्यादीस आमिष दाखवले. फिर्यादीस यांना एनी डेस्क नावाचे स्क्रीन शेअर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून साडेसात लाख रुपये काढून घेतली. पैसे घेऊन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच मूळ मुद्दल न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.