गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची पाऊण कोटींची फसवणूक

0
263

तळेगाव दाभाडे, दि. २४ (पीसीबी) – गुंतवणुकीच्या बहाण्याने चार जणांनी मिळून महिलेची 72 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 1 डिसेंबर 2021 ते 14 सप्टेंबर 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली.

राजू शाळीकराम ढोरे (वय 42, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. वाशीम), विकी ढोरे (वय 22, रा. उल्हासनगर), अक्षय ज्ञानेश्वर डांभरे (वय 25, रा. यवतमाळ) आणि एक महिला (वय 40) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कंपनीत गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी महिलेची आरोपींनी 72 लाख रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.