गुंतवणुकीच्या बहाण्याने शिक्षकाची 13 लाखांची फसवणूक

0
58

वाकड, दि. 20 (प्रतिनिधी)

गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून एका शिक्षकाची 13 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 23 एप्रिल ते 29 जून या कालावधीत रहाटणी येथे घडली.

नरेंद्रकुमार श्रावण घोडीचोर (वय 45, रा. रहाटणी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वीरेंद्र मनसुखानी, अदिती सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुपला जॉईन केले. जास्त नफ्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 13 लाख 48 हजार 532 रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.