गुंतवणुकीच्या बहाण्याने 75 लाखांची फसवणूक

0
261
187143521

रहाटणी, दि. १४ (पीसीबी) – शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 75 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 3 डिसेंबर ते 13 मार्च या कालावधीत रहाटणी येथे घडली.

मनोज आत्मप्रकाश भाटीया (वय 46, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आदित्य पाटील आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज हे शेअर मार्केट ट्रेडिंगच्या शोधात होते. त्यांना आरोपींनी एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. त्यांना एका कंपनीच्या आयपीओ बाबत माहिती देऊन 75 लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर सात हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवून उर्वरित रकमेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.