गुंगीचे औषध पाजून 16 लाखांचे दागिने लंपास

0
50

मोलकरणीसह चौघांवर गुन्हा दाखल

निगडी, दि. 26 (पीसीबी) : चहा आणि कॉफी मधून गुंगीचे औषध पाजून घर मालकाला बेशुद्ध करत घरकाम करणाऱ्या मोलकरणीने तिच्या साथीदारांसोबत मिळून 16 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 24) प्राधिकरण निगडी येथे घडली.

देवेंद्र गुमानमल लुंकड (वय 67, रा. प्राधिकरण निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनामिका (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनामिका फिर्यादी यांच्या घरी घरकाम करत होती. तिने तिच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादी यांचा मुलगा आणि सुनेला चहा व कॉफी मधून गुंगीकारक औषध दिले. दोघांना बेशुद्ध करून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 16 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.