गावाकडील भांडणावरून एकास मारहाण

0
104

निगडी दि. 16 ऑगस्ट (पीसीबी)
गावाकडे झालेल्या भांडणाच्या कारणावरून शहरात येऊन दोन जणांनी एका तरुणाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 14) ओटास्कीम, निगडी येथे घडली.

राहूल किसन पवार (वय 24) आणि किसन शंकर पवार (वय 42, रा. सिद्धार्थनगर, ओटास्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी यांचे पती यांच्यामध्ये गावाकडे भांडण आहे. या भांडणाच्या कारणावरून बुधवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यांनी शिवीगाळ करीत फिर्यादी यांचे पती परशुराम यांना हाताने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना ढकलून देत पुन्हा फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.