गाववाले असल्‍याचे सांगत केली मारहाण

0
132
crime

पिंपरी,दि 0 ९ (पीसीबी)

तुला साइडने जायला रोड नाही का, आम्‍ही इथले गाववाले आहोत, असे म्‍हणत दुचाकीस्‍वाराला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. ८) सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास देंडगे वस्‍ती, जांभे येथे घडली.

मंगेश नाना पन्हाळे वय २६, रा. देडगे वस्‍ती, जांभे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओमकार सोरटे (वय २०, रा. दारूंब्रे) आणि त्‍याचा साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी फिय्रादी पन्‍हाळे हे आपल्‍या दुचाकीवरून पत्‍नीसह चालले होते. ते देडगे वस्‍ती, जांभे येथे आले असता आरोपींनी त्‍यांची दुचाकी अडविली. तुला साइडने रोड नाही का, असे बोलून शिवीगाळ केली. आम्ही इथले गाववाले आहोत, असे बोलून तो त्याचे गाडीवरून खाली उतरता फिर्यादी पन्‍हाळे यांच्‍या कानावाली मारली. तसेच हातातील कडे काढून डोक्यात मारुन जखमी केले. तसेच त्याच्‍या साथीदारानेही फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथा बुक्यांनी मारहाण केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.