गावठी दारू विक्री प्रकरणी एकास अटक

0
27

भोसरी, दि. 31 (पीसीबी)
गावठी दारू विक्री प्रकरणी गुन्हे शाखा यूनिट एकने एकास अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. ३०) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, भोसरी येथे करण्यात आली.

राहुल दशरथ हिरोत (वय ३२, रा. खंडोबामाळ, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार तुषार वराडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबामाळ भोसरी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने गावठी दारू विक्रीसाठी ठेवली असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राहुल याच्या घरी कारवाई करत पाच हजार रुपये किमतीची ५० लिटर गावठी दारू जप्त केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.