गावठी दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा

0
148

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) : बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) बावधान येथे करण्यात आली.

पोलीस अंमलदार रवी पवार यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू विक्रीसाठी जवळ बाळगली. याबाबत माहिती मिळाली असता हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली. या कारवाई मध्ये 28 हजार 350 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांची चाहूल लागताच महिला पळून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.