गावठी दारू भट्टीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा

0
363

गावठी दारू बनवणाऱ्या एका भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी दोन लाख 32 हजारांचा ऐवज नष्ट केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.13) सायंकाळी शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढले बुद्रुक येथे करण्यात आली.

अरमान दलपत राठोड (रा. डोणेवस्ती, आढले बुद्रुक, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विजय नलगे यांनी याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आढले बुद्रुक येथे गावठी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये दोन लाख 32 हजार रुपये किमतीची 11 हजार 600 गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन भिजत घातले होते. हे रसायन पोलिसांनी नष्ट केले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.