गावठी दारू बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा

0
110

निगडी, दि. १९ (पीसीबी)

गावठी दारू बाळगल्या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) दुपारी तीन वाजताच्या सुमारास आकुर्डी येथे करण्यात आली.

जब्बार आप्पासाहेब मुजावर (वय 50, रा. आकुर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अंमलदार सागर अवसरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुजावर याने त्याच्या ताब्यात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू बाळगली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने कारवाई करत मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्याच्या ताब्यातून दहा हजार 200 रुपये किमतीची 102 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.