गावठी दारू निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा, 6 लाख रुपयांचे रसायन जप्त

0
403

पुणे, दि. ३० (पीसीबी) – गावठी दारु निर्मीती करणाऱ्या महिलेवर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.29) पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे लगत मोकळ्या जागेत केली.

याप्रकरणी संबंधीत महिलेविरोधात शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कुरऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिल्या हि बेकायदेशीर रित्या गावठी दारु बनवत होती. यावेळी पोलिसांनी छापा टाकून तिच्याकडून 6 लाख रुपयांचे 6 हजार लिटर दारु निर्मीतीचे रसायन जप्त करण्यात आले आहे. याचा पुढील तपास शिरगाव परंदवाडी पोलीस करत आहेत.