गावठी दारु निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल

0
259

चाकण, दि. २ (पीसीबी) – गावठी दारु निर्मिती प्रकरणी चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.29) गोजवाडी परिसरात भामा नदिच्या किनारी चाकण पोलिसांनी केली आहे.

यावरून महिलेविरोधात चाकण पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही 2 हजार लीटर च्या लोखंडी ड्रम मध्ये 1 हजार 800 लीटर रसायन रापत टाकलेले अदांजे 1 लाख 8 हजार रुपये किंमती गुन्ह्याचा माल पोलिसांनी नष्ट केला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.