गायक केके यांचे निधन संशयास्पद, डोक्याला जखम..

0
314

मुंबई, दि. १ (पीसीबी) – पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला च्यानंतर आता गायक केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. ३१ मेच्या रात्री ११.३० च्या सुमारास केके यांच्या मृत्यूची बातमी कळताच कोणालाही विश्वास बसेना. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अक्षय कुमार, रश्मी देसाई, गायक राहुल वैद्य आणि स्वरा भास्करपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नथ यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

आतापर्यंत मृत्यूचं खरं कारण समोर आलेलं नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. कोलकात्यात एका कॉन्सर्टदरम्यान केके लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. यानंतर केके यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके यांच्या मृत्यूबाबत डॉक्टर अद्याप उघडपणे काहीही बोलण्याचे टाळत आहेत. रिपोर्टनुसार, केके यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होती. संगीत कार्यक्रमादरम्यान ते बेशुद्ध पडले, डॉक्टरांनी मृत घोषित केले
ई- टाइम्सच्या वृत्तानुसार, केके यांना ३१ मे रोजी रात्री १०.३० वाजता इस्पितळात नेण्यात आले होते. दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंच नावाच्या सभागृहात ते कार्यक्रम सादर करत होते. त्यानंतर केके यांची प्रकृती खालावली आणि ते अचानक बेशुद्ध पडले. केके कोलकात्यात दोन दिवस परफॉर्म करण्यासाठी गेले होते. सोमवार, ३० मे रोजी त्यांचा पहिला कॉन्सर्ट झालेला.

लाइव्ह परफॉर्मन्सची झलक काही तासांपूर्वी शेअर करण्यात आली होती. केकेने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कोलकातामधील लाइव्ह परफॉर्मन्सच्या काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यानंतर काही तासांनंतर केके जगाचा निरोप घेतील असा कोणीही विचार केला नव्हता.

केकेने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही, या गाण्यांनी स्टारडम दिले
५३ वर्षीय गायक केके यांनी १९९६ मध्ये ‘माचीस’ सिनेमातील ‘छोड आये हम वो गल्लीयां’ गाणे गाऊन पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी ‘तडप तडप के’, ‘बर्दाश्त नहीं कर सकता’, ‘दस बहाने’, ‘आंखों में तेरी’, ‘तू ही मेरी शब है’, ‘खुदा जाने’ आणि ‘जिंदगी दो पल की’ अशी एकाहून एक सरस गाणी गायली होती. केके हे एक असे गायक होते जे प्रत्येक शैलीतील आणि प्रत्येक भावनेचं गाणी सहज गाऊ शकत होते. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे केके यांनी कधीही संगीताचे कोणतेही अधिकृत प्रशिक्षण घेतले नाही.