गाडी नावावर करून दे म्हटल्याने पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण

0
141

गाडी नावावर करून दे म्हटल्याने तरुणाला बाहेर बोलावून घेत पिस्तुल सारखे हत्यार दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत मारहाण केली. ही घटना 11 मार्च रोजी दुपारी एक वाजता वडगाव रोड, आळंदी येथे घडली.

आशिष साहेबराव जाधव (वय 23, रा. चिंबळी, ता खेड) यांनी याप्रकरणी 9 जून रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज हनुमंत गवळी (रा निगडी), ओमकार शशिकांत ढावरे (रा. निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आशिष यांना वडगाव रोडला बोलावून घेतले. आशिष तिथे गेले असता; आशिष हे त्यांच्याकडील कार नावावर करून मागत असल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना ‘तुला लय मस्ती आली आहे का. तू जर पोलीस ठाण्यात गेलास तर तुला गोळ्या घालून तुझा कायमचा पत्ता कट करेल’ अशी धमकी देत पिस्तुल सदृश हत्याराचा धाक दाखवत मारहाण केली. आरोपी सुरज गवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.