गाडी दुरूस्तीच्या नावाखाली पावणे दोन लाखांची फसवणूक

0
108
187143521

दि. १९ ऑगस्ट (पीसीबी) वाकड
गाडी दुरूस्तीच्या नावाखाली एक लाख 78 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 30 जानेवारी 2022 ते 30 जून 2024 या कालावधीत वाकड येथे घडली.

अ‍ॅड. चंद्रशेखर शिवाजी भुजबळ (वय 40, रा. वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परबजित सिंग, राजकुमार गुंदेचा आणि हार्दिक मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्याची एस.एक्स.फोर ही गाडी आरोपी याच्याकडे दुरूस्तीसाठी दिली. त्यासाठी त्याने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी एक लाख 33 हजार रुपये दिले. फिर्यादी हे आरोपीला भेटले असता आरोपी याने त्याचे सासरे आरोपी राजकुमार गुंदेचा यांना बोलावून त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी आरोपी हार्दिक मेहता हे दुरूस्त करून देतो, असे सांगून जास्तीचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून 45 हजार रुपये घेतले. मात्र अद्यापपर्यंत गाडी दुरूस्त करून न देता फिर्यादी यांची एक लाख 78 हजार रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.